Ad Code

नवीन पोस्ट

8/recent/ticker-posts

चर्चेतील व्यक्ती

 व्यक्तीवेध 



🔸राजेश बन्सल: रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब (RBIH) याचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी


✍️राजेश बन्सल यांची रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब (RBIH) याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.


✍️भारतीय रिझर्व्ह बँकेचा एक भाग असलेले रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब (RBIH) ही आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आर्थिक क्षेत्रात अभिनव पद्धतींचा अवलंब करण्यास पाठिंबा देणारी संस्था आहे. या संस्थेची स्थापना ऑगस्ट 2020 मध्ये झाली.


🏛भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) विषयी


🔸भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारतातील केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय रुपया चलनाचे आर्थिक धोरण नियंत्रित करते.


🔸RBIचे मुख्य कार्यालय मुंबई (महाराष्ट्र) या शहरात आहे.


🔸RBIच्या मुख्यालयी एक पूर्ण वेळ गव्हर्नर आणि जास्तीत-जास्त चार उपगव्हर्नर नियुक्त केले जातात.


🔸 ‘भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम-1934’ च्या उपबंधानुसार ब्रिटिश राजवटीत संस्थेचे दि. 1 एप्रिल 1935 पासून कार्य सुरू झाले. दि. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, RBI चे दि. 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले.


🔸सर ओसबोर्न स्मिथ (1 एप्रिल 1935 - 30 जून 1937) हे RBI चे पहिले गव्हर्नर होते. सर सी॰ डी॰ देशमुख (11 ऑगस्ट 1943 - 30 जून 1949) हे RBIचे तिसरे आणि प्रथम भारतीय गव्हर्नर होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code bottom