Ad Code

नवीन पोस्ट

8/recent/ticker-posts

अनूप चंद्र पांडे यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती

MPSC  Current Affairs 

 

अनूप चंद्र पांडे यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती


  • केंद्र सरकारने अनुप चंद्र पांडे यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. 
  • . 1984 च्या तुकडीतील उत्तर प्रदेश केडरचा ते निवृत्त आयएएस अधिकारी आहेत . 
  • ते सुमारे तीन वर्षे या पदावर काम करतील आणि फेब्रुवारी 2024 मध्ये ते सेवानिवृत्त होतील.
  • माजी मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) सुनील अरोरा यांच्या निवृत्तीनंतर त्यांची नेमणूक झाली आहे.
  • अशा प्रकारे आता निवडणूक आयोग  आपल्या तीन सदस्यांच्या पूर्ण क्षमतेने  पुनर्संचयितझाला आहे  . निवडणूक आयोगाचे  अन्य सदस्य म्हणजे सीईसी सुशील चंद्र आणि निवडणूक आयुक्त राजीव कुमार.
  • आता ते २०२२ मध्ये उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंडमधील आगामी विधानसभा निवडणुकांवर देखरेख ठेवतील.


  निवडणूक आयोगाविषयी





  • निवडणूक आयोग ही एक स्वायत्त घटनात्मकसंस्था  आहे जी भारतातील केंद्र  आणि राज्य निवडणुकांच्या प्रक्रियेचे संचालन  करते. 
  • याची स्थापना २ ५ जानेवारी, १९५० रोजी  कलम ३२4 नुसार करण्यात आली.  त्यामुळे २५ जानेवारी हा दिवस दरवर्षी  राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो.
  • लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडणुकादेखील या निवडणुक आयोगामार्फत  घेतल्या जातात. 
  • पंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुकांशी त्याचा संबंध नाही. पंचायत व नगरपालिका निवडणुका घेण्यासाठी स्वतंत्र राज्य निवडणूक आयोग आहे.
  • मुख्य निवडणूक आयुक्त  आणि इतर  निवडणूक आयुक्त यांची नेमणूक सहा वर्षांच्या मुदतीच्या कालावधीसाठी किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत केली जाते. 
  •   सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या प्रमाणे त्यानाच  दर्जा, वेतन आणि मानपत्रे आहेत .
  • भारताचे पहिले निवडणूक आयुक्त हे सुकुमार सेन होते 
  • २००९ पासून निवडणूक आयोग मतदार जागृती साठी Systematic Voters’ Education and Electoral Participation (SVEEP )हा कार्यक्रम राबवत आहे 

©spardhaparikshaexpress 
MPSC  राज्यसेवा, संयुक्त पूर्व परीक्षा गट ब , सरळसेवा आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशा चालू घडामोडी अपडेट्स मिळवा आमच्या वेबसाइटवर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code bottom