Ad Code

नवीन पोस्ट

8/recent/ticker-posts

बोर व्याघ्र प्रकल्प

 

बोर व्याघ्र प्रकल्प - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र

  • महाराष्ट्रात एकूण सहा व्याघ्र आहेत. त्यातील पाच विदर्भात आहेत. हे पाच आणि इतर राज्यातील आठ व्याघ्र प्रकल्प मिळून एकूण १३ व्याघ्र प्रकल्प विदर्भाच्या ३०० चौ.कि.मी च्या परिक्षेत्रात आहेत. त्यामुळेच विदर्भाला देशाची व्याघ्र राजधानी म्हटले जाते. 



  • अधिकृत व्याघ्र गणना (स्टेटस ऑफ टायगर्स इन इंडिया २०१८ ) नुसार महाराष्ट्रातील वाघांची संख्या   ३१२ इतकी  आहे २०१४ च्या  व्याघ्र गणना (स्टेटस ऑफ टायगर्स इन इंडिया ) नुसार हि संख्या १९० होती    तर ‘Status of tigers and leopards in Maharashtra’ नुसार महाराष्ट्रात २०२० मध्ये ३३१ वाघ होते 


  • महाराष्ट्रात जे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत त्यामध्ये बोर व्याघ्र प्रकल्प, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प यांचा समावेश आहे.

  • महाराष्ट्रात जे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत त्यामध्ये बोर व्याघ्र प्रकल्प, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प यांचा समावेश आहे.

  • २७ नोव्हेंबर १९७० रोजी बोरला अभयारण्य म्हणून घोषीत करण्यात आले. बोर व्याघ्र प्रकल्प हा नागपूर जिल्ह्याच्या दक्षिण सीमेस आणि वर्धा जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर आहे. याशिवाय ६१.१० चौ.कि.मी जलाशयाचा यात समावेश करण्यात आला आहे.

  • बोर हे सातपुडा-मैकल येथील संपन्न जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करते. हे सातपुडा पूर्व-पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तर सीमेपसून सुरु होऊन कान्हा येथील मैकल टेकडीला मिळते.

  • वन्यप्राण्यांची शिकार होऊ नये आणि जैवविविधता टिकून राहावी तसेच ती संवर्धित व्हावी म्हणून १९७० मध्ये या क्षेत्राला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले.

  • कान्हा आणि पेंच अभयारण्याप्रमाणेच येथे तृणभक्षी व मांसभक्षी प्राण्यांची संख्या मोठ्याप्रमाणात आहेत. २०१४ च्या व्याघ्र गणनेनुसार येथे ४ ते ५ प्रौढ वाघांसह त्यांच्या बछड्यांचा आढळ आहे.

  • जुन्या बोर अभयारण्याचे क्षेत्र ६१.१०० चौ.किमी आहे. नवीन बोर वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्र ६०.६९ चौ.कि.मी आहे तर नवीन बोर विस्तारित वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्र १६.३१ चौ.कि.मी आहे.

  • जंगलाची सलगता हे या अभयारण्याचे वैशिष्ट्य असून ही सलगताच वन्यप्राण्यांच्या विशेषत: वाघांच्या संवर्धनात महत्वाची ठरत आहे.







    टिप्पणी पोस्ट करा

    0 टिप्पण्या

    Ad Code bottom