Ad Code

नवीन पोस्ट

8/recent/ticker-posts

महिला आणि बालविकास महाराष्ट्र सरकार योजना


महिला आणि बालविकास महाराष्ट्र सरकार योजना 




मनोधैर्य योजना 


  • बलात्कार आणि ऍसिड हल्ल्यातील  पीडित महिला व बालके  यांच्या पुनर्वसनसाठी  आर्थिक सहाय्य पुरविणे या साठी  महाराष्ट्र शासन  कडून  २ऑक्टोबर २०१३ पासून  मनोधैर्य  योजना  राबविण्यात  येत आहे 
  • बलात्कार आणि हल्ला पिडीतांना  (महिला आणि बालक) झालेल्या मानसिक आघातातून सावरणे सर्वात महत्वाचे असते. त्याच बरोबरीने त्यांना निवारा, आर्थिक मदत, वैद्यकीय आणि कायदेशीर मदत तसेच समुपदेशन सेवा उपलब्ध करून देणेही महत्वाचे असते.
  • हे लक्षात घेऊनच राज्यातील महिला आणि बाल विकास विभाग मनोधैर्य योजनेची अमंलबजावणी करीत आहे. याद्वारे पिडीतांना 1 लाख रुपयांची आणि विशेष प्रकरणांमध्ये 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. पिडीतांचे आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक असा निवारा, समुपमदेशन, वैद्यकीय आणि कायदेशीर मदत, शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते.
  • माननीय उच्च न्यायालय निर्देशानुसार योजनेच्या  आर्थिक निकषामध्ये बदल करून सुधारित मनोधैर्य योजना लागू करण्यात  आली आहे 
  • सिंगल विंडो सिस्टिम : या योजनेंतर्गत  अर्ज स्वीकारण्यापासून ते आर्थिक सहाय्य   पुरविणे  याबाबतची  सर्व प्रक्रिया राज्य/ जिल्हा विधिक सेवा प्राधिकरण याना हस्तांतरण  करण्यात आली आहे 
  • ITPA अधिनियम अंतर्गत मुलींचा समावेश -सुधारित योजनामध्ये ITPA अधिनियमांतर्गत  सुटका करण्यात आलेल्या मुलींनाही  सहाय्य करण्यात येते

माझी कन्या भाग्यश्री योजना 
  • 1 ऑगस्ट 2017 पासून महिला आणि बाल विकास, महाराष्ट्र शासनातर्फे सर्वप्रथम 'माझी कन्या भाग्यश्री' योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
  • या योजने अंतर्गत, शासन खालील प्रमाणे आर्थिक सहाय्य प्रदान करेल
  • या योजनेची काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:
  1. एक मुलगी: 18 वर्षे कालावधीसाठी रु. 50,000
  2. दोन मुली: प्रत्येक मुलीचे नावे 25 हजार रुपये
  3. 7.5 लाख रुपयांपर्यंत मासिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना आणि फक्त कौटुंबिक नियोजन प्रमाणपत्र सादर केल्यानंतर लाभ
  • प्रत्येक सहा वर्षांनंतर कुटुंब जमा व्याज काढून घेऊ शकते


बेटी बचाव बेटी  पढाव 

  •   बालक लिंग गुणोत्तर वृध्दीगंत करण्याच्या प्रमुख उद्देशाने राज्याच्या महिला आणि बालकं विकास विभागाने केंद्र शासनाची बेटी बचाओ बेटी पढाओ योजना बीड, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, औरंगाबाद, वाशिम, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगली आणि जालना या दहा जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित केली आहे.
  • बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेची अतिमहत्वाकांक्षी उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:
    • पूर्वग्रहदूषित दृष्टीकोनामुळे होणाऱ्या लिंग निवडीला प्रतिबंध करणे. (स्त्रीभृण हत्यांना प्रतिबंध करणे)
    • मुलींच्या जिवीताची आणि संरक्षणाची खातरजमा करणे
    • मुलींच्या शिक्षणाची आणि सामाजिक सहभागाची खातरजमा करणे
  • दि.१५ जून २०१६ पासून हिंगोली,सोलापूर, पुणे , परभणी , नाशिक, लातूर या अतिरिक्त जिल्हयांचा समावेश सदर योजनेत करण्यात आला आहे
  • शासन निर्णय दि. ६ ऑगस्ट ,२०१८ नुसार उर्वरित १९ जिल्हयात  सदर योजना  करण्यात आली आहे
  • देशात महाराष्ट्र हे असे राज्य आहे कि , त्यामधील जळगाव आणि उस्मानाबाद जिल्हयांना प्रभावी समुदाय प्रतिबद्धता ,प्रसूती पूर्व  लिंग निदान परिरक्षण ,पूर्वसंकल्पनेची अंमलबजावणी ,तसेच मुलींना बाळ शिक्षणात सक्षम बनविणे  या क्षेत्रात उल्लेखनीय कार्यबद्दल  विशेष पुरस्काराने माननीय मंत्री महिला व  बाळ विकास मंत्रालय  (भारत सरकार)  यांच्या  हस्ते दि. २४ जानेवारी ,२०१७ रोजी ,राष्ट्रीय बालिका दिवशी सन्मानित करण्यात आले आहे


  • ©spardhapariksha88

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code bottom