भारताची संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेचे सदस्य (United Nations Economic and Social Council (ECOSOC) म्हणून निवड झाली आहे
- महत्वाचे मुद्दे :
- २०२२-२४ कालावधी साठी आशिया-पॅसिफिक गटातुन भारताची निवड झाली आहे. या गटातून अन्य निवडलेल्या देशांमध्ये ओमान, अफगाणिस्तान आणि कझाकस्तानचा समावेश आहे.
- निवडलेले इतर आफ्रिकन देश म्हणजे- कोटे डी’आयव्होर, इस्वातिनी, मॉरिशस, ट्युनिशिया आणि युनायटेड रिपब्लीक ऑफ टांझानिया.
- पूर्व युरोपीय राज्यांपैकी क्रोएशिया आणि झेक प्रजासत्ताक निवडले गेले.
- बेलिझ, पेरू आणि चिली हे निवडलेल्या लॅटिन अमेरिकन आणि कॅरिबियन राज्यांमध्ये आहेत.
- इकॉनॉमिक अँड सोशल कौन्सिलच्या पोटनिवडणुकीत, न्यूझीलंड आणि डेन्मार्क जानेवारी ते डिसेंबर 2022 या कालावधीसाठी तर इस्राईल 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत निवडूनआले आहेत .
- ECOSOC म्हणजे काय?
- ECOSOC ही एक 54-सदस्यीय आर्थिक आणि सामाजिक परिषद आहे,
- ही संघटना 1954 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सनदेने स्थापन झाली .
- युनायटेड नेशन्स सिस्टमचे हृदय असल्याने, शाश्वत विकासची आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीयअंग वृद्धिंगत करण्यात मदत करते.
- विचारविनिमय आणि नवीन कल्पना मांडणे हे या मध्यवर्ती मंचाचे प्रमुख कार्य आहे.
- जागतिक पातळीवर मान्य केलेली उद्दीष्टे साध्य करण्यासाठी करण्याच्या प्रयत्नांना मूर्त रूप देणे आणि समन्वय निर्माण करण्याचे काम ही संघटना करते .
- ही संघटना , संयुक्त राष्ट्रांच्या मोठ्या परिषद आणि समिटांचे आयोजन करते.
- जीवनमान उंचावणे , पूर्ण रोजगार, आर्थिक व सामाजिक प्रगती, जागतिक आर्थिक, सामाजिक व आरोग्यविषयक समस्यांसाठी उपाय शोधणे इत्यादी ECOSOC ची महत्त्वपूर्ण कार्ये आहेत.
MPSC Current Affairs
MPSC Material
MPSC booklist
MPSC notes
0 टिप्पण्या