Ad Code

नवीन पोस्ट

8/recent/ticker-posts

 

भारतीय नौदलासाठी आणखी सहा पाणबुड्या पी-७५ इंडिया’  



४३ हजार कोटींचा प्रकल्प

  • नौदलासाठी देशी बनावटीच्या सहा पारंपरिक सहा पाणबुड्यांची बांधणी करण्याच्या ४३ हजार कोटी रुपयांच्या महाप्रकल्पाला शुक्रवारी संरक्षण मंत्रालयाने मान्यता दिली.
  • चीन आपल्या सागरी क्षमतेमध्ये वाढ करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर नौदलाचे धैर्य वाढविण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
  • संरक्षण क्षेत्रातील परदेशी कंपन्यांसमवेत देशी संरक्षण उत्पादकांची सामरिक भागीदारी असावी याबाबत चर्चा सुरू होती त्यानुसार या पाणबुड्यांची बांधणी करण्यात येणार आहे आणि त्यामुळे आयातीवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी होणार आहे,
  • या महाप्रकल्पाचे ‘पी-७५ इंडिया’ असे नामकरण करण्यात आले असून त्याला संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण संपादन परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाची अंमलबजावणी १२ वर्षांत केली जाणार आहे. 
  • लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो आणि माझगाव डॉक लि.ला विनंतीप्रस्ताव दिला जाणार आहे.
  • भारतीय नौदलाची २४ नव्या पाणबुड्या घेण्याची योजना आहे.
  • सध्या नौदलाकडे १५ पारंपरिक आणि दोन आण्विक पाणबुड्या आहेत.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code bottom