Ad Code

नवीन पोस्ट

8/recent/ticker-posts

महाराष्ट्राचे व्याघ्र वैभव




  •  भारताने व्याघ्र संवर्धनच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे.
  • भारतात १९७३ साली व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात झाली. त्यावेळी देशात ९ व्याघ्र प्रकल्प होते. आता त्याची संख्या ३८ वर गेली आहे. नॅशनल टायगर कॉन्झरवेशन ॲथॉरिटीमुळे गेल्या दहा वर्षात वाघांची संख्या वाढण्याबरोबरच त्यांची माहिती संकलन करण्यात (डॉक्युमेंटेशन) ही आपला देश पुढे आहे.
  • स्टेटस् ऑफ टायगर्स इन इंडिया च्या अहवालानुसार देशात २००६ साली सुमारे १४११ च्या आसपास असलेली देशातील वाघांची संख्या २०१० साली १७०६ तर आज २०१४ साली झालेल्या सर्वेक्षणात ती २२२६ इतकी झाली आहे. वाघांची संख्या वाढणे हे एक प्रकारे चांगल्या वनसंवर्धनाचे द्योतक आहे. कारण वाघांची चांगली संख्या असण्यासाठी त्यांचा नैसर्गिक अधिवास उत्तम असणे आवश्यक आहे. म्हणजेच वाघांसाठी चांगले अन्न, निवारा असलेले जंगल असणे आवश्यक आहे. व्याघ्र संख्येमध्ये महाराष्ट्र देशात पाचव्या क्रमांकावर आहे.
  • केंद्र शासनाच्या याच अहवालानुसार महाराष्ट्रात २००६ साली १०३, २०१० साली १६९ आणि २०१४ साली झालेल्या सर्वेक्षणात सरासरी १९० वाघांचे अस्तित्व आढळून आल्याची नोंद आहे. व्याघ्र रक्षणासाठी महाराष्ट्रात विशेष व्याघ्र दलाची स्थापना करण्यात आली आहे. या दलाकडून व्याघ्र संरक्षणाचे काम अत्यंत जबाबदारीने पार पाडण्यात येत आहे. याशिवाय वनाधिकाऱ्यांना शस्त्र परवाने, व्याघ्र प्रकल्पात वायरलेस सेट देण्यात आले आहेत तर काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे


महाराष्ट्रातील सहा व्याघ्र प्रकल्प

अ.क्र

व्याघ्र प्रकल्पाचे नाव

अधिसूचना दिनांक

अति संरक्षित क्षेत्र  चौ.कि.मी

बफर क्षेत्र

चौ.कि.मी

एकूण क्षेत्र

चौ.कि.मी

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प

२७/१२/२००७

०५/०५/२०१०

६२५.८२

११०१.७७

१७२७.५९

पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर

२७/१२/२००७

२९/०९/२०१०

२५७.२६

४८३.९६

७४१.२२

मेळघाट व्याघ्र प्रकल्प

२७/१२/२००७

२९/०९/२०१०

१५००.४९

१२६८.०४

२७६८.५३

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प,कोल्हापूर

२१/०८/२०१२

२१/०८/२०१२

६००.१२

५६५.४५

११६५.५७

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प

१२/१२/२०१३

६५६.३६

--

६५६.३६

बोर व्याघ्र प्रकल्प

१६/०८/२०१४

१३८.१२

--

१३८.१२

.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code bottom