Ad Code

नवीन पोस्ट

8/recent/ticker-posts

नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य

 



नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य

  • बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, जागतिक वन्यजीव निधी आणि वनविभाग महाराष्ट्र यांच्या संयुक्तिक प्रयत्नाने निर्माण झालेलं नांदूर मधमेश्वर हे एक सुरेख पक्षी अभयारण्य आहे. 
  • महाराष्ट्राचं भरतपूर असं या  अभयारण्याला संबोधलं जातं


  • २०२० मध्ये नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्याचा समावेश रामसर स्थळ यादीत झाला आहे .रामसर करार या पाणथळ जमिनीच्या संवर्धनासाठीचा आंतराष्ट्रीय करार आहे. या करारात विविध देशातील  पाणथळ जमिनीचा समावेश  संवर्धन करण्यासाठी रामसर यादीत केला जातो 
  • संपन्न जैव विविधतेचा अनुभव घेण्यासाठी एक उत्कृष्ट असं स्थान आहे. नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यात हे अभयारण्य वसलेलं असून त्याचं एकूण क्षेत्रफळ १००.१२ चौ.कि.मी आहे. 
  • १९८६ साली हे क्षेत्र अभयारण्य म्हणून अधिसूचित करण्यात आले.
  • जलाशयातील उथळ पाणी, पाण्यातील विपूल जलचर, विविध पाण वनस्पती, किनाऱ्याला असलेली वनराई आणि जवळच्या सिंचित शेतातील पिकं यामुळे पक्षांसाठी हे आकर्षणाचे ठिकाण झाले असून त्यांच्या निवासासाठी एक उत्तम स्थळ गणलं गेलं आहे. हे महाराष्ट्रातील एक उत्तम ‘पक्षीतीर्थ’ आहे. पक्षी निरीक्षणातून येथे २४० हून अधिक प्रकारचे पक्षी असल्याचे आढळून आले आहे. येथील जलाशयात २४ जातीचे मासे आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code bottom