पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान (पीएमएसएमए)
प्रस्तावना :
- गर्भवती महिलांसाठी ९ जून २०१६ रोजी एक नवी आरोग्य योजना पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान सुरु करण्यात आली
- या योजनेमुळे माता व शिशु मृत्यू दर कमी करता येऊ शकतो.
- आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाच्या रिपोर्टवुसार सहस्राब्दी विकास ध्येय (मिलेनियम डेव्हलपमेंट गोल) 5 नुसार भारतात १९९० मध्ये ५६० प्रती १ लाख माता बाल मृत्यु दर २०१५ मध्ये १४० प्रती १ लाख पर्यंत कमी आणण्याचे ध्येय होते. युनिसेफच्या नुसार ५५,००० पेक्षा जास्त गर्भवती महिला प्रसुतीच्यावेळी मृत्यू पावतात. याला वेळोवेळी मेडिकल चिकित्सा आणि फॉलोअप घेऊन थांबवले जाऊ शकते. हि सरकारची चिंताजनक तसेच प्राथमिक बाब आहे. या गोष्टीची पुष्टी केंद्र सरकारद्वारा गर्भवती महिलांच्या जरुरतीनुसार सुरु केलेल्या काहि योजनेद्वारे होते.
लाभार्थी :
- हा कार्यक्रम अशा सर्व गर्भवती महिलांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवतो ज्या गर्भावस्थेच्या २ आणि ३ ट्राइमेस्टर मध्ये आहेत. पीएमएसएमए योजनेनुसार सर्व सरकारी रुग्णालये आणि आरोग्य केंद्रावर प्रत्यके महिन्याच्या ९ तारखेला सर्व गर्भवती महिलांची मोफत वैद्यकीय तपासणी केली जाईल.
उद्देश :
- गर्भवती महिलांसाठी एक निरोगी जीवन प्रदान केले जाईल.
- मातृत्व मृत्यू दर कमी केला जाईल
- गर्भवती महिलांना त्यांच्या आरोग्याच्या समस्या आणि परिस्थितीबाबत जागरूक केले जाईल.
- मुलांचे निरोगी जीवन आणि सुरक्षित प्रसूती ची खात्री केली जाईल.
- पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानाचे प्रमुख वैशिष्टे
- हि योजना फक्त गर्भवतीमहिलांना लागू राहील.
- प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला मोफत आरोग्य तपासणी होईल
- या योजनेनुसार सर्व प्रकारची वैद्यकीय तपासणी पूर्णपणे मोफत आहे.
- तपासण्या वैद्यकीय केंद्रे, सरकारी आणि खाजगी रुग्णालयात आणि देशातील खाजगी दवाखान्यात केल्या जातील
- महिलांना त्यांच्या आरोग्य समस्यांच्या आधारावर वेगळे चिन्हांकित केले जाईल ज्यामुळे डॉक्टरांना सहजपणे समस्या ओळखू शकतील.
भारत सरकारने या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना सर्व प्रकारचे वैद्यकीय सहाय्य मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे.
पात्रता :
- हि योजना फक्त गर्भवती महिलांसाठी लागू आहे.
- ग्रामीण भागात गर्भवती महिलांना या मोफत आरोग्य देखभाल मिळवण्यासाठी प्रेरित केले जाईल.
- गर्भावस्था के 3 से 6 महीने में महिलाएं इस प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान (पीएमएसएमए) का लाभ लेने के लिए पात्र होंगी ।
- गर्भावस्थाच्या ३ ते ६ महिण्यात महिला या प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाचा लाभ घेण्यास पात्र राहील
पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान अंतर्गत (PIMSMA), खालील सेवा पुरवल्या आहेत
- सर्व लाभार्थींचा सविस्तर इतिहास घेणे आणि परीक्षण आणि मुल्यांकन कोणत्याही धोक्याची लक्षणे, गुंतागुंत किंवा कोणत्याही उच्च जोखमीची परिस्थिती जाणून घेण्यासाठी आवश्यक आहे.
- ANC तपासणी दरम्यान लाभार्थी रक्तदाब, ओटीपोट परीक्षण, गर्भाच्या हृदयाचे ठोके याची तपासणी केली पाहिजे
- जर सार्वजनिक आरोग्य सुविधासाठी आलेली महिलेला जर कोणत्याही विशिष्ट तपासणीची गरज असेल, तर तपासणीसाठी नमुना घेऊन त्याचे परीक्षणासाठी योग्य केंदावर नेण्यात आले पाहिजे.. ANM / MPW ला एकत्रित नमुना तपासणीसाठी पाठवणी आणि गर्भवती महिलांपर्यंत त्याचे परिणाम आणि आवश्यक पाठपुराव्यासाठी जबाबदार झाले पाहिजे
- पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान (PMSMA) द्वारा ANM / स्टाफ नर्स द्वारा तपासणी केल्या नंतर वैद्यकीय अधिकारीद्वारा सुद्धा सर्व आलेल्या लाभार्थींची तपासणी केली पाहिजे.
- सर्व उच्च जोखीम चिन्हित गर्भवती महिलांना उच्च सुविधांसाठी रेफर करणे आणि जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम मदत डेस्क कि जो या सुविधां प्रदान करण्यासाठी स्थापन केला आहे तो महिलांना या सुविधांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेतील. MCP कार्ड सर्व लाभार्थींना जारी केले जातील.
- सर्व उच्च जोखीम (गुंतागुंतीसहित) नुसार चिन्हांकित केलेल्या महिलांना प्रसूती आणि स्रीरोग तज्ञ / कॉम्प्रेहेंसिव इमर्जंसी प्रसूति केयर सेंटर / बेसिक इमजेंसी प्रसूति केयर सेंटर तज्ञ )द्वारा विलाज केला जाईल. जर आवश्यकता असेल टर या तऱ्हेची प्रकरणे उच्च स्तरीय सुविधासाठी रेफरल पावती सहित पाठवले जाईल आणि या पावतीवर संभवित निदान आणि उपचारासाठी लिहिले जातील
- गर्भधारणेच्या दुसर्या किंवा तिसर्या महिन्यादरम्यान सर्व गर्भवती महिलांसाठी एक अल्ट्रासाऊंडची शिभारस केली आहे. जर आवश्यक असेल, USG सेवा PPP (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) मोड मध्ये उपलब्ध करून दिली जाईल. आणि त्याचा खर्च जीएसएसके (जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम) अंतर्गत बुक केला जाईल.
- प्रत्येक गर्भवती महिलांना या सुविधा सोडण्यापूर्वी आहार, आराम, सुरक्षित लैंगिक संबंध, संरक्षण, जन्म सज्जता, धोक्याची ओळख, संस्थात्मक प्रसूती आणि प्रसूतीनंतर परिवार नियोजन या विषयांची माहिती व्यक्तिगत किंवा समूह गटात दिली जाईल.
- या दवाखान्यात एमसीपी कार्ड अनिवार्यपणे भरले गेले पाहिजे. एक स्टीकर जो गर्भवती महिलेची स्थिती आणि जोखीम घटक संकेतांक आहे ते प्रत्येक भेटीच्या वेळी एमसीपी कार्डवर जोडले जाईल.
- हिरवे स्टीकर – ज्यांना कोणताही धोका नाही अशा गर्भवती महिलांसाठी
- लाल स्टीकर - ज्या महिला गर्भावस्थेच्या उच्च जोखीम गटात आहेत अशांसाठी
- निळे स्टीकर – उच्च रक्तदाब असणार्या गर्भवती महिलांसाठी
- पिवळे स्टीकर – मधुमेह, हायपोथायरायडीज्म, एसटीआय असणार्या गर्भवती महिलासाठी
योजनेचे फायदे :
- पीएमएसएमए योजनेनुसार सर्व सरकारी रुग्णालय आणि आरोग्य केंद्र प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला सर्व गर्भवती महिलांची मोफत वैद्यकीय तपासणी करतील. या तपासणीत हिमोग्लोबिन, रक्त, शुगर लेव्हल, रक्तदाब, वजन आणि इतर सामान्य तपासण्या होतील.
- जेंव्हा गर्भ ३ ते ६ महिन्यांचा होईल तेंव्हा महिला सरकारी दवाखान्यात किंवा आरोग्य केंद्रांत किंवा कोणत्याही संबधित खाजगी द्वाख्यानात वेळेवर तपासणीसाठी संपर्क करू शकते. पंतप्रधानानी खाजगी डॉक्टरांना पीएमएसएमए योजनेत सामील होण्यासाठी आवाहन केले आहे.
- पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान योजनेंतर्गत, गर्भवती महिलांना गर्भावस्था दरम्यान त्यांच्या आरोग्य समस्याविषयीची माहिती दिली जाईल.
- वेळेवर तपासणी केल्यामुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यता कमी होईल
- वेगवेगळ्या प्रकारचे स्टीकर वापरल्याने डॉक्टरांना विलाज करणे सोपे होईल.
- हि भारत सरकारद्वारा दिलेली पूर्णपणे मोफत आरोग्य सुविधा आहे.
- गर्भवती महिला विशेषता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिला कुपोषित असतात. त्यांना गर्भधारणे दम्यान पोषक घातक भेटत नाहीत. यामुळे बहुतेक वेळा जन्माला येणारी मुले कोणत्या ना कोणत्या आजाराची शिकार होऊनच जन्माला येतात आणि याबरोबरच कुपोषित असतात.
- जर गर्भवती महिलांना वेळच्यावेळी देखरेख केली टर नवजात बालकांना होणाऱ्या बऱ्याच आजारांची समस्या कमी होईल. गरिबी आणि जागरूकता नसल्यामुळे बहुतेक महिला वेळेवर वैद्यकीय सल्ला आणि घेण्यात येत असलेल्या काळजीचा फायदा घेत नाही. पीएमएसएमए मुळे प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला गर्भवती महिलांची मोफत वैद्यकीय तपासणी होत असल्याची खात्री होईल. गर्भवती महिला देशातील कोणत्याही सरकारी रुग्णालयात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घेऊ शकतात.
- नियमित फॉलो-अप घेतल्यावर निश्चितपणे रोगजनक जन्म घेणाऱ्या मुलांची संख्या कमी होईल. निशितपणे वैद्यकीय तपासणीनंतर आरोग्याची योग्य पाळत ठेवली पाहिजे. याबरोबरच पोषण पूरक आहार घटक उपलब्धता खात्री होते. बहुतेक महिलाना दोन वेळेच्या जेवणाची सुद्धा मारामार असते. अशा वेळी योग्य पोषण आणि जरुरींची पूर्तता करणे त्यांच्यासाठी मुश्कील असते. यात आणखी एक हे हि कारण आहे कि बर्याच महिला घरातील कामात इतक्या व्यस्त असतात कि त्यांना स्वताच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत.
- पीएमएसएमए योजनाचे घटक अन्य सरकारी योजनांना समर्थन देत आहे. खासकरून जननी सुरक्षा योजना, ज्यात गर्भवती महिला सरकारी आरोग्य केंद्र आणि काही संबधित खाजगी रुग्णालयात मोफत प्रसूतीची सुविधा प्राप्त करून घेऊ शकतात.
- सरकार प्रसूतीपूर्व आणि प्रसुतीनंतरची देखभाल आणि सुविधांवर जेवढा खर्च करीत आहें, ते खाली आणता येऊ शकते, त्यासाठी गर्भवती महिलांनी नियमित तपासणी करून घेतली पाहिजे. त्यांना वेळेवर योग्य आहार उपलब्ध करून दिला पाहिजे.
- ब्लडप्रेशर, हिमोग्लोबिन, यूरिन, शुगर, वजन सारख्या तपासण्या जलद तसेच मोफत होतील. तसेच रिपोर्टच्या आधारवर स्त्री रोग तज्ञ किंवा डॉक्टरचा सल्ला मोफत प्राप्त होईल. । विशेष तपासणी सेवा एचआईव्ही, सिफलिस, पीएचसी स्तरावर तसेच हाइपोथयराइडिस ची तपासणी जिल्हा स्तरीय चिकित्सासंस्थावर केली जाईल. तज्ञांच्या सल्ल्यानुसार संस्थांवर उपलब्ध सोनोग्राफी सेवा दिली जाईल.
- वैद्यकीय संस्थांवर योजनेची अंमलबजावणी यशस्वी करण्याची जबाबदारी वैद्यकीय अधिकारी प्रभारी यांच्यावर राहील. त्यांना वैद्यकीय संस्थेच्या मुख्य ठिकाणी OPD, IPD, ANC खोलीबाहेर आणि पंतप्रधान सुरक्षित मातृत्व दिवसाचे आयोजनाची तारीख, दिनांक ऑईल पेंटने लिहिले पाहिजे. वैद्यकीय संस्थावर निर्धारित खोलीत प्रसूतीपूर्व तपासणीसाठी उपयुक्त उपकरणे हार्ट मॉनिटर, परिक्षण टेबल, साइडचा पर्दा, खिड़कीवर पर्दा, वॉशबेसिन, लिक्विड साबण, रनिंग वाटर ची व्यवस्था करावी लागेल.
- योजनेमुळे भारतातील माता मृत्यू दर कमी होईल
MPSC material
MPSC notes PDF
MPSC current affairs
MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आजच आपल्या ब्लॉगला फॉलो करा
0 टिप्पण्या